उस्मानाबाद, दि. 2 : शहरातील प्रभाग क्रमांक 13 व 14 मधील नाल्या, रस्ते, अस्वच्छता यासह अन्य नागरी समस्यांबाबत प्रसेना प्रतिष्ठानच्यावतीने निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे. पालिकेने निवेदनाची दखल न घेतल्यास पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

प्रसेना प्रतिष्ठानचे संदीप बनसोडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 13 व 14 मधील नागरिक तुंबलेल्या नाल्या, गटारी, खराब रस्ते व अस्वच्छतेकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अस्वच्छतेमुळे पसरलेल्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास होत आहे. अनेक नागरिक आजारी पडले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे या प्रभागातील रस्त्याची तत्काळ करावीत, प्रभागातील परिसरात निर्जुंकीकरणाचे काम करण्याचे आदेश पालिका प्रशासनास द्यावे, अशी मागणी केली आहे.

पालिकेने निवेदनाची दखल न घेतल्यास पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर प्रसेना प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप बनसोडे यांनी केली आहे. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांना निवेदन देतेवेळी अध्यक्ष संदीप बनसोडे यांच्यासह प्रसेंजीत सरवदे, प्रज्योत बनसोडे, विक्की बनसोडे, अमर माळाळे, सचिन डोंगरे, सुमित क्षीरसागर, महेश ओहाळ, शैलेंद्र शिंगाडे, राजाभाऊ जाधव व बबलू बनसोडे आदी उपस्थित होते. 

 
Top