उस्मानाबाद, दि. 02 : आष्टा (कासार) ता. लोहारा येथील इब्राहीम मुल्ला हे दि.28/11/2020 रोजी घराला कुलूप लावुन बाहेरगावी गेले होते. दरम्यान मध्यरात्री त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडुन घरातील सोन्या-चांदीचे दागीने व रोख रक्कम चोरीस गेली होती. यावरून मुरूम पो.ठा.येथे गु.र.नं.235/2020 हा दाखल आहे. तपासा दरम्यान स्था.गु.षाखेच्या पोनि. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्षनाखालील पोउपनि पांडुरंग माने, पोना चव्हाण, टेळे, पोकॉ आरसेवाड, मारलापल्ले, होळकर यांचे पथक आरोपीच्या मागावर होते. 

गोपनिय खबरेच्या आधारे पथकाने आज दि.02/12/2020 रोजी आश्टा (कासार) येथे छापा टाकुन गावकरी-परमेष्वर माने यास ताब्यात घेतले. त्याचे ताब्यातुन पथकाने नमुद चोरीतील 29 ग्रॅम सोन्याचे दागीने, 320 ग्रॅम चांदीचे दागीन्यांसह 94,000 रू.रोख रक्कम जप्त केली आहे.उर्वरीत तपास कामी आरोपीस मुरूम पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पथकाने केलेल्या या कामगीरी बद्दल मा.पोलीस अधीक्षक श्री.राज तिलक रौषन व अपर पोलीस अधीक्षक श्री.संदीप पालवे यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

 
Top