उस्मानाबाद, दि. 09 : नेत्र विभाग,जिल्हा शासकीय रुग्णालय,उस्मानाबाद रुग्णालयातील कोविड-19 या संसर्गजन्य आजाराच्या काळात कोरोना विभागात अविरतपणे सेवा देणारे वैदयकीय अधिकारी तसेच कोविड विभागतील इन्चार्ज तसेच अधिपरिचारिका व वर्ग-4 कर्मचारी या सर्व कोविड योध्दयाचा दि ०९ डिसेंबर-२०२० रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी.के. पाटील यांच्या हस्ते सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन देशमुख,कोविड विभागचे इन्चार्ज डॉ.ईस्माईल मुल्ला, तसेच जिल्हा रुग्णालयातील मनोविकृती तज्ञ डॉ. महेश कानडे, वैदकीय अधिकारी डॉ.मुंकुंद माने,डॉ.अमोल कापसे,नेत्र विभाग प्रमुख डॉ. अर्चना गोरे, नेत्र शल्यचिकित्सक डॉ.विरभद्र कोटलवाड,डॉ.महेश पाटील अधिसेविका श्रीमती नलिनी दलभंजन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नेत्र विभागातील नेत्रचिकित्सा अधिकारी श्री बी.एम. घाडगे, श्री शेख ए.एल.,वॉर्ड इन्चार्ज श्री. शेख रौफ तसेच नेत्र विभागातील सर्व अधिपरिचारिका व कर्मचारी हे उपस्थित होते.
कोविड-19 प्रादुर्भावामुळे मागील काही महिण्यापासुन नेत्रविभागातील मोतिबिंदु शस्त्रक्रिया करणे थांबविण्यात आले होते. सदयस्थितीस कोविड-१९ आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रण येते असल्यामुळे नेत्र विभागातील मोतिबिंदु शस्त्रक्रिया हया पुर्ववत पणे चालु करण्यात आल्या आहेत. शस्त्रक्रिया पुर्व रुग्णांच्या कोविड-१९ सह इतर सर्व आवश्यक तपासण्या करुन मोतिबिंदुमुळे अंधत्व आलेल्या रुग्णांवार शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील ज्या रुग्णांची मोतिबिंदु शस्त्रक्रिया करावयाची आहे.
अशा रुग्णांनी व त्यांची आवश्यक सर्व तपासण्या व कोविड-१९ प्रार्दुभावाच्या काळात शासनाकडुन प्राप्त सुचना व नियमाचे पालन करुन शस्त्रक्रिया करुन घेण्याबाबत चे आवाहन जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी.के. पाटील यांनी केले आहे.
यावेळी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व कोविड योध्दयांनी मरणोत्तर नेत्रदान चा संकल्प करुन मरणोत्तर नेत्रदानाचे समंतीपत्र भरुन दिले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नेत्रचिकित्सा अधिकारी श्री. शेख ए.एल. यांनी करुन उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.