उस्मानाबाद, दि. 09 : युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्‍या मॅगोनेट प्रणालीव्‍दारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन 2019-20 मध्‍ये 7944 निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. निर्यातक्षम आंबा बागाची नोंदणी करीता मॅगोनेट ही ऑनलाईन प्रणाली दि.1 डिसेंबर,2020 पासून कार्यान्वित करण्‍यात आलेली आहे.निर्यातक्षम बागांच्‍या नोंदणी करीता अपेडाने फार्म रजिस्‍टेशन  मोबाईल अॅप उपलब्‍ध केलेला आहे.सदर अॅप डाऊनलोड करुन नोंदणी सुविधा करण्‍यात आलेल्‍या आहेत. 

तरी सर्व आंबा बागायतदारांना विनंती करण्‍यात येते की सन 2020-21 करीता नोंदणी करीता संबंधित कृषि सहाय्यक,कृषि पर्यवेक्षक, कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचे संपर्क साधून त्‍वरीत अर्ज करण्‍यात यावेत. निर्यातक्षम आंबा बागाचे नोंदणी 5 वर्षासाठी वैध असेल. त्‍यामुळे गतवर्षी नोंदणी केलेल्‍या आंबा बागाची नव्‍याने नोंदणी/नुतनीकरण करण्‍याची आवश्‍यकता नाही.तर नव्‍याने नोंदणीकरणेसाठी विहीत नमुन्‍यातील अर्ज,7/12, 8अ, बागेचा नकाशा इत्‍यादी कागदपत्राची आवश्‍यक आहे. मॅगोनेटव्‍दारे नोंदणी करण्‍याची अंतिम मुदत 31 मार्च,2020 अशी आहे.

निर्यातक्षम बागाची वेळेत नोंदणी करणे करीता संबंधित जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधून विहीत मुदतीत नोंदणी करण्‍याचे आवाहन संचालक फलोत्‍पादन यांचेकडून करण्‍यात आले आहे.

 
Top