तुळजापूर, दि. 25 : मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेना महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज शुक्रवार दि. 25 रोजी तुळजापुर येथे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.

दर्शनानंतर तुळजापुर शिवसेना यांच्यावतीने महापौर पेडणेकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी  शिवसेनेचे जिल्हा सह संपर्कप्रमुख अनिल खोचरे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शामल वडणे-पवार, माजी उप जिल्हा प्रमुख शाम पवार, शहरप्रमुख सुधीर कदम, उप शहरप्रमुख बापुसाहेब नाईकवाडी, युवा सेना शहर प्रमुख सागर इंगळे, अर्जुन साळुंके आदीजण उपस्थित होते.



 
Top