नळदुर्ग, दि.३१ : वसंतनगर (नळदुर्ग ) येथे गेल्या 50 वर्षापासून राहत असलेल्या धरणग्रस्त कुटुंबाना आठ अ चा उतारा तसेच मालकी हक्क (कबाला) त्वरीत मिळावे, अन्यथा मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी सामुदायिक जलसमाधी घेण्याचा इशारा वसंतनगर येथील ६६ नागरिकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाद्वारे दिला होता. याची दखल घेऊन पुनर्वसन विभाग या प्रकरणी पुरावे व कागदपञ एकञ करत असल्याचे सांगितल्यानंतर व आंदोलकाच्या प्रतिनिधीनी मंगववार  दि.२९ रोजी  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट घेतल्यानंतर जिल्हाधिकारी श्री दिवेगावकर  हे या प्रकरणी सकारात्मक असल्याचे सांगितल्यानंतर  आंदोलन तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित केल्याची माहिती सुर्यकांत राठोड, सुनील राठोड व दत्ता राठोड यांनी दिली.

 दरम्यान तहसीलदार तुळजापूर यांच्या वतीने मंडळ अधिकारी अमर गांधले व पोलीस कर्मचाऱ्यांनी बुधवारी दि.२९ रोजी सायंकाळीही आंदोलकांची समजूत काढून आश्वस्त केले.

 बोरीधरण (कुरनुर) प्रकल्पग्रस्त नागरिक  मागील ५० वर्षापासून वसंत नगर येथे स्थाईक झालेल्या नागरिकांना आठ अ व घराचे मालकी हक्क (कबाला) देण्याची मागणी करीत आहेत. याबाबत अनेकदा पाठपुरावाही करण्यात आला आहे मात्र अद्याप या धरणग्रस्त कुटुंबांना ते राहत असलेल्या जागेचा मालकी हक्क देण्यात आलेला नाही. सन १९६६ साली कुरनुर प्रकल्प (बोरी धरण) बांधण्यात आले आहे. या धरण बांधणीसाठी जवळपास सहा लमाण तांड्यातील मोठ्या प्रमाणात राहती घरे व शेतजमीन भूसंपादन करुन घेतली होती. धरणग्रस्त नागरीक गेल्या ५० वर्षापासुन वसंतनगर येथे राहत आहेत. शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या ६६ नागरिकांनी बुधवार दि.३० रोजी बोरी धरणात जल समाधी घेण्याचा निर्णय घेतला होता.

 
Top