उस्मानाबाद, दि. 31 : उस्मानाबाद येथील मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविका सौ.प्रेमाताई पाटील यांची तर कार्याध्यक्ष म्हणून अतुल कावरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा सोहळा न आयोजित करता, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर यासारखे सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. यंदा पासून प्रतिवर्षी जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी महिलांची निवड केली जाणार असल्याचे आयोजकांनी निश्चित केले आहे. त्याचाच भाग म्हणून या वर्षी सौ.प्रेमाताई पाटील यांच्या नावास अध्यक्ष म्हणून सर्वांनी मान्यता दिली आहे.
यावेळी समितीचे मार्गदर्शक एम.डी, देशमुख सर, प्रा.भालचंद्र जाधव, डॉ.सुभाष वाघ, मधुकर अनभुले, अग्निवेश शिंदे, जयराज खोचरे, अभिजित निंबाळकर, रोहित बागल, मयूर काकडे, प्रा.विवेक कापसे, प्रा.प्रदीप गोरे उपस्थित होते.