उस्मानाबाद, दि. 31 : सौ.शकुंतला रमेश दापके- देशमुख यांचे पहाटे अल्पशा आजाराने गुरुवार दि. 31 डिसेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान सोलापुर येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्या रामकृष्ण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. रमेश दापके-देशमुख यांच्या पत्नी व डॉ. दिग्गज दापके-देशमुख यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळगावी तळेगाव ता.अहमदपूर जि.लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी,पती, सुन, नातवंडे असा परिवार आहे.