नळदुर्ग, दि. ०१ :

हिंदूहृदयसम्राट स्वा. सावरकर युवा मंच, नळदुर्गच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या २०२१ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजपा शहराध्यक्ष पद्माकर(पिंटू)घोडके यांच्या हस्ते व  सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, मनसेचे जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, नगरसेवक विनायक अहंकारी सुनील गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी स्वा.सावरकर युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, अर्जुन कुलकर्णी आदी उपस्थित होते. दिनदर्शिकेस जेष्ठ पत्रकार विलास येडगे, दीपक जगदाळे, पत्रकार शिवाजी नाईक, भगवंत सुरवसे, सुहास येडगे  तानाजी जाधव, विशाल डुकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 
Top