काटी : उमाजी गायकवाड

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा  57892 मतांची आघाडी घेत विजयाची हॅट्रिक साधली. तुळजापूर तालुक्यातील काटी व सावरगाव येथे शुक्रवार दि. 4 रोजी सकाळी 9:30 वाजता महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करीत एकमेकांना लाडू भरवून  येथील एस.टी. स्टॅन्डवर महाविकास आघाडीचे उमेदवार चव्हाण यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, कॉंग्रेसचे सुजित हंगरगेकर, शिवसेनेचे प्रदीप मगर यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. 

            यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, सावरगावचे सरपंच रामेश्वर तोडकरी, काटीचे उपसरपंच सुजित हंगरगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय सेलचे जिल्हा सरचिटणीस अशोक जाधव,माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,बाबुमियॉ काझी,माजी सरपंच शामराव आगलावे,करीम बेग, नजीब काझी, मोहन जाधव, जुबेर शेख,पोपट थोरबोले, नंदू जाधव, अप्पा आगलावे,संताजी गायकवाड, अमर गाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top