किलज : राम जळकोटे

तुळजापूर तालुक्यातील किलज येथे विठ्ठल रकुमाईच्या मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला दि. १ डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली आठ महिने सर्व धार्मिक स्थळ बंद होती व आता आठ महिन्यानंतर महाराष्ट्र शासनाने मंदिरे उघडण्यास दिलेल्या परवानगी नंतर गावाच्या कमिटीने योग्य ती खबरदारी घेऊन हा सप्ताहाला सुरुवात केली आहे. तर काल दि. ३ डिसेंबर रोजी युवाव्याखाते तथा पत्रकार राम जळकोटे यांनी वारकरी संप्रदायातील मंडळींशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला आणि वारकरी संप्रदायातील लोकांची भावना जाणून घेतली. 



यावेळी हभप. तथा अखंड हरीनाम सप्ताहाचे प्रमुख. मोहन पाटील यांनी कीर्तनातून होत असलेले समाजप्रबोधन यातून येणाऱ्या पिढीत बदल हे नक्कीच होतील, यावर्षी पंढरीला आम्ही एका जागी चिंतन करून पंढरीचे दर्शन घेतलो अशी भावना त्यांनी बोलतेवेळी व्यक्त केली. तर गावातील माजी पोलीस उपनिरीक्षक शिवराज मरडे यांनी डॉक्टर, पोलीस, नर्स या तिन्ही देवदूतांना आपण सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. तसेच या अश्या समाजप्रबोधन मधून आम्ही गावातील तरुण पिढी ही योग्य मार्गाला लागावी यासाठी प्रयत्न करीत आहोत. गावातील अनेक माताभगिनींचे संसार उध्वस्त होत आहेत यासाठी कारणीभूत ठरलेले दारूबंदी सुद्धा आम्ही बंद करीत आहोत असे मरडे यांनी सांगितले. 

दि.१ डिसेंबर पासून सुरू झालेला हा सप्ताह दि.७ डिसेंबर पर्यंत चालू राहणार असून यामध्ये कमी लोक आणि योग्य ती खबरदारी घेऊनहा सोहळा पार पाडीत आहेत, असे कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.

 
Top