तुळजापूर, दि. 04 : तालुक्यातील देवसिंगा (तुळ) येथील संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक तानाजी जाधव यांना मधुकर धस स्मृती धस स्मृती गौरव पुरस्कार मराठवाडा लोक विकास मंचच्या वतीने कळंब येथे दि. 3 डिसेंबर रोजी प्रदान करण्यात आला.

तानाजी जाधव यांनी देवसिंगासह तुळजापूर तालुक्यातील दहा गावांमध्ये गरीब कुटुंबातील व्यक्तींना धान्य वाटप करुन कोरोनामध्ये जगण्याचा आधार दिला. संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी कार्य केल्याने त्यांना मराठवाडा लोक विकास मंचच्या वतीने मधुकर धस स्मृती गौरव पुरस्कार देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे अफार्म चे संचालक एम एन कोंढाळकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्याय संस्थेचे संस्थापक विश्वनाथ तोडकर, प्राचार्य गोविंद बिराजदार, प्राचार्य व्यंकट अनगुंठे, रोहयो चे महाराष्ट्रचे प्रवक्ते प्रमोद झिंजाडे, समाज विकास संस्थेचे संस्थापक भुमिपुत्र वाघ, तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती. तसेच भिकाजी जाधव, बब्रुवान पारवे, नेताजी शिंदे, रामभाऊ लागडे आदीजण उपस्थित होते.

 
Top