तुळजापूर, दि. 04 : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी शुक्रवार दि. 4 डिसेंबर रोजी भाविकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. मंदिरासमोरील महाद्वार चौकामध्ये मोकाट वळू जनावरांचा सुळसुळाट दिसून येत असून दोन मोकाट कटाळ्याची टक्कर झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते.

तब्बल अर्धा तास या जनावरांची टक्कर चालू होती. शहरामध्ये बहुतांश ठिकाणी या जनावरांचा वावर असल्याने भाविकांसह नागरिकामध्ये भीतीचे वातावरण असून जीव मुठीत घेऊन भाविक वावर करत आहेत. तुळजापूर नगर परिषदेने मागील काही दिवसात जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याचे आदेश काढले होते. परंतु ते आदेश कागदावरच राहिले की काय? असा प्रश्न उद्भवत आहे. प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची भाविकामधून मागणी होत आहे.

 
Top