उस्मानाबाद, दि. 04 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद आणि स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, उस्मानाबाद यांचे संयुक्त विद्यमाने, स्वतःचा उद्योग/स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी "मुद्रा योजना व कौशल्य विकास प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराच्या विविध संधी' या विषयावर ऑनलाईन माहिती व मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यामध्ये बँकेच्या माध्यमातुन विविध शासकीय योजनांद्वारे अर्थसहाय्य घेऊन उद्योग/स्वयंरोजगार उभारणी करणे तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणातून विविध स्वयंरोजगारातील संधीबाबत मोफत ऑनलाईन माहिती व मार्गदर्शन वेबिनार आयोजित करण्यात आलेला आहे. या ऑनलाईन सत्रास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन श्री.निलेश विजयकर, लीड बँक मॅनेजर, स्टेट बँक ऑफ इंडिया, उस्मानाबाद व श्री.गोविंद कुलकर्णी, डायरेक्टर, स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र उस्मानाबाद हे संबोधित करणार आहेत.
सदरील वेबिनार मंगळवार, दिनांक ०८ डिसेंबर २०२० रोजी वेळ दुपारी १२-०० ते १-०० वेळेत Google Meet च्या माध्यमातून होणार असून या ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी Meeting URL: https://meet.google.com/xpt-jkta-pdi या लिंकचा वापर करून जास्तीत जास्त विद्यार्थी/ पालकांनी आणि इच्छुकांनी ऑनलाईन सहभाग नोंदवावा. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्र.०२४७२-२२२२३६ वर संपर्क साधावा. असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,उस्मानाबाद यांनी केलेले आहे.