परंडा, दि. 04 : दत्तात्रय तुकाराम सांगडे, रा. माणकेश्वर, ता. भुम हे दि. 01.12.2020 रोजी 17.00 वा. सु. आईसह माणकेश्वर गट क्र. 438 मधील आपल्या शेतात होते. यावेळी भाऊबंद- एकनाथ भगवान सांगडे, जनार्धन सांगडे, हणुमंत सांगडे, बळीराम सांगडे यांनी तेथे जाउन शेतीच्या वादातून दत्तात्रय सांगडे व त्यांच्या आईस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच ट्रॅक्टरच्या पिकात चालवून पिकाचे नुकसान केले. अशा मजकुराच्या दत्तात्रय सांगडे यांनी आज दि. 04.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 323, 427, 447, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.