जळकोट, दि. ४ : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानमोडी येथे पुणे येथील येथे डिवोच बँक एक्झिक्यूटिव्ह आनंद मोहरीर यांनी शाळेस भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना कापडी मास्क दोन प्रतींमध्ये वाटप केले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिपान गुंजकर, मुख्याध्यापक विक्रम पाचंगे, सदस्य राजेंद्र गायकवाड, बाळू थोरात ,गावातील ग्रामस्थ शाळेतील सर्व विद्यार्थी वर्ग, शाळेतील सहशिक्षक रमेश दूधभाते, रामकृष्ण मोहिते ,श्रीमती सुचिता चव्हाण, जयबाई पवार उपस्थित होते.