उस्मानाबाद, दि. 04 : उस्मानाबाद जिल्हयामध्ये दि.१२-डिसेंबर, २०२० रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असुन पक्षकार व नागरिकांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होवून सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती.एस.एम.शिंदे,प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय,मुंबई यांचे सुचनेनुसार सदरचे लोकन्यायालय आयोजित करण्यात आलेले आहे. उस्मानाबाद जिल्हा मुख्यालयासह
उस्मानाबाद जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फौजदारी, एन. आय. अॅक्टची प्रकरणे, बँकाची कर्ज वसुली वगैरेची प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्याखालील प्रकरणे, कौटूंबीक वादाची प्रकरणे, विद्युत कायद्यानुसार समझोतायोग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरची दावा दाखल पुर्व प्रकरणे आपसीत समझोत्याकरीता ठेवून ती सामजस्यांने सोडविण्याचे आवाहन श्रीमती. एस. एम. शिंदे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये ठेवावयाची असतील त्यांनी संबंधीत न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद येथे स्वतः येवून किंवा हेल्पलाईन फोन नं. ०२४७२-२२५४२४ वर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.असे सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.