उस्मानाबाद, दि. 4 : भारत निवडणूक आयोगाने,०१जानेवारी, २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे.
या कार्यक्रमांतर्गत दि.१७ नोव्हेंबर,२०२० रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असुन या कार्यक्रमांतर्गत दि. १५ डिसेंबर, २०२० पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. या कालावधीत मतदार नोंदणी संबंधाने विशेष मोहिमा राबविण्याचे आयोगाचे निर्देश आहेत.
05 व 06 डिसेंबर तसेच 12 व 13 डिसेंबर या दोन शनिवार व रविवार विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी आपले दावे व हरकती 15 डिसेंबरपर्यंत स्वीकरण्यात येणार असुन सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्ष आणि मतदारांनी याची नोंद घ्यावी.असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.