तुळजापूर : सतीश महामुनी
आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाऊंडेशन कोल्हापूर तर्फे गुणवंत शिक्षक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथे 20 डिसेंबर रोजी संपन्न झाला यावेळी तुळजापूर येथील वरिष्ठ क्रीडा मार्गदर्शक महंमद इसाक पटेल यांना राष्ट्रीय पातळी वरील पहिल्या क्रमांकाचा "उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ साहत्यिक आणि विचारवंत सितायानकार प्रा. किसनराव कुराडे व उद्योगपती मा.डॉ. एम. बी. शेख (कॉन्सिल मेंबर रयत शिक्षण संस्था सातारा) यांच्या हस्ते देण्यात आला\ या कार्यक्रमात 09 राष्ट्रीय पुरस्कार आणि 74 राज्य पुरस्कार वितरीत करण्यात आले.
राज्यातील शिक्षकांना राज्य व राष्ट्रीय पातळी वरील कामाची दखल घेऊन हा गौरव पुरस्कार देण्यात येतो, यंदा हा मान तुळजापूर तालुक्याला राष्ट्रीय पातळी वरील पहिल्या क्रमांकाचा "उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक 2020" हा पुरस्कार महंमद इसाक पटेल यांच्या रूपाने मिळाला. पुरस्कार मिळवल्याबद्दल महंमद इसाक पटेल यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.