किलज, दि. 22 : राम जळकोटे
तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे गरीब, निराधार, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकरी, गरजूंना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
बहुजन हिताय ट्रस्ट पुणे संचलित बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृह उमरगा यांच्या माध्यमातून यामध्ये डाळ, तांदूळ, साबणे, पारले बिस्कीट, मिठपुडे ,आटा, तेल पॅकेट सह आदी वस्तूचे वाटप करण्यात आले. तुळजापूर तालुक्यातील होर्टी गावातील शिवव्याख्याते ऋषिकेश घोडके यांच्या पुढाकाराने आतापर्यंत होर्टी, किलज, चिकुंद्रा, जळकोट, केशेगाव सह आदी वाड्यावस्त्यांवर जाऊन १५० किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी धम्मचारी प्रज्ञजित त्यांचे सहकारी राम कांबळे,महादेव भोसले, अक्षय गायकवाड, बागडे गुरुजी, हरिदास कांबळे, सह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हे कार्य करून यांनी समाजाशी वेगळं नातं जोडले आहेत. या वाटपाचे गरजूंच्या हस्ते वाटप करण्यात आले.