तुळजापूर, दि. २१ : केंद्र सरकारच्या या इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने  निवेदनाद्वारे निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने ही दरवाढ तत्काळ थांबून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 

संपूर्ण राज्यामध्ये केंद्र सरकारच्या पेट्रोल व डिझेल दरवाढीचे निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते याचाच एक भाग म्हणून तुळजापूर तहसीलदार यांना राष्ट्रवादी पदवीधर संघ तुळजापूर तालुका यांचे वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी  तुळजापूर तालुका अध्यक्ष प्रतिक जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब बागल, अनिकेत काठेवाड, तालुका उपाध्यक्ष सिद्धेश्वर जमदाडे, तालुका सचिव विक्रम हजारे, शहर कार्याध्यक्ष जमीर फुटानकर ,राहूल हंगरगेकर ,वैभव सरवदे, नरेंद्र मुळे, संतोष डाके व तुळजापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांचे निवेदनावर स्वाक्षरी आहेत व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top