तुळजापूर, दि. २१ : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष अध्यक्ष रविकांत वरपे यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने केलेल्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केला.
प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी तुळजापूर येथील युवक काँग्रेस राष्ट्रवादी अध्यक्ष संदीप गंगणे आणि शहराध्यक्ष शरद जगदाळे यांनी त्यांचे स्वागत केले. विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे, युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम ,माजी युवक तालुकाध्यक्ष महेश चोपदार, शहराध्यक्ष शरद जगदाळे तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, शशिकांत नवले, आप्पासाहेब पवार, तोफिक शेख, बाळासाहेब चिखलकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
महाराष्ट्रामध्ये सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून तरुण युवकांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी सरकारच्या असणारे योजना आपण आपल्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन यानिमित्ताने प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी केले आहे. तत्पूर्वी कार्याध्यक्ष यांनी तुळजाभवानी मंदिरात जाऊन तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले आणि दर्शना नंतर त्यांचा युवक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न झाला.