उस्मानाबाद : महेश पाटील

असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान, कुलदैवत असलेल्या बेंबळी येथील श्रीक्षेञ खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी निमित्त "यळकोट यळकोट" च्या जयघोषात "श्री" च्या मानाच्या काठयांची मिरवणूक काढण्यात आली.

यंदा कोरोनाच्या संकटामुळे याञेवर प्रशासनाने निर्बंध घातले असून पंचक्रोशितील भाविकांना दर्शनासाठी येता आले नाही. सर्व मंदिरातील सर्व विधिवत पूजा मानकरी पुजारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मंदिर परिसरात मंदिरावर भव्य,दिव्य विद्युत रोषणाई करण्यात आली. "श्री" च्या मुर्तीला अभ्यंगस्नान घालून अभिषेक विविध धार्मिक विधिपूर्ण करण्यात आला.मंदिर परिसरात हलगी  सवाद्य छबिना व मानाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुख्य पुजारी,भाविक उपस्थित होते.

 
Top