नळदुर्ग : एस.के. गायकवाड
जि.प.कन्या प्रशाला नळदुर्ग ता.तुळजापूर येथे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
नळदुर्ग शहर व तुळजापूर तालुका शाखेच्या वतीने जि.प.कन्या प्रशाला बौद्ध नगर नळदुर्ग येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइं तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइं चे जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, रिपाइं अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशीद कुरेशी, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड, नगरसेवक फारुख कुरेशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटर नँशनल इंग्लिश मेडीअम स्कूल नळदुर्ग चे संस्थापक मारुती खारवे ,प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.गायकवाड आदी उपस्थित होते.
याकार्यक्रमाचे प्रास्ताविक दुर्वास बनसोडे यांनी केले तर सुत्रसंचलन रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांनी केले. आभार प्रदर्शन रिपाइंचे नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे यांनी केले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यीनीना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी चांगदेव रणे,राजेंद्र साखरे, सहशिक्षक आर.डी.तांबे, कमलाकर गायकवाड, एस.डी.जाधव, डी.बी.सगर,एच.एस.आक्तार,सहशिक्षीका एन.बी.गावीत,के.आर.पुदाले,रजनी वानखेडे सह कार्यकर्ते, विद्यार्थ्यी उपस्थित होते.