जळकोट : मेघराज किलजे

येथून जवळच असलेल्या रामनगरमध्ये एसबीआय फाउंडेशन व दिलासा प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी योजनांची सांगड विषयक चर्चासत्र कार्यक्रमांतर्गत गावातील शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांची माहिती देण्यात आली.

रामनगर येथे पार पडलेल्या या चर्चासत्रात जळकोटचे कृषी सहाय्यक जी. एस. कांबळे यांनी सहभागी शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी विषयक विविध योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. पीक व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, किड नियंत्रण, बीज प्रक्रिया आदिबाबत सविस्तर माहिती दिली. 

यावेळी एसबीआय फाउंडेशन व दिलासाचे कार्यक्रम समन्वयक गुरुदेव राठोड, रामनगरचे उपसरपंच सुनील चव्हाण, गणेश चव्हाण, चागू चव्हाण, प्रकाश राठोड, नटराज राठोड, धनु चव्हाण, तुकाराम चव्हाण, गोविंद चव्हाण, तुकाराम राठोड आदी शेतकरी, युवक, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन गुरुदेव राठोड यांनी केले.

 
Top