काटी : उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील बुथ क्रमांक 570 बुथवर 213 पदवीधर मतदारापैकी 179 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून तालुक्यात सर्वाधिक 84 टक्के मतदान झाले असून तामलवाडी येथील बुथवर 269 पदवीधर मतदारापैकी 198 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला येथे  एकूण 73 टक्के मतदान झाले आहे. तुळजापूर तालुक्यात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे मतदान शांततेत पार पडले . 

या पदवीधर मतदार संघासाठी एकूण 35 उमेदवार आपले नशीब अजमावत असून तालुक्यात तुळजापूर येथील दोन मतदार केंद्रावर बुथवर अनुक्रमे  67.43, व 74.12 टक्के, मंगरुळ 75.34, अरळी 72.44 टक्के, इटकळ 74.47 टक्के, अणदूर 68.34 टक्के, नळदुर्ग 73.17 टक्के, सावरगाव 84.3 टक्के, तामलवाडी 73.60 टक्के,सलगरा 66.47 टक्के, जळकोट 75.42 टक्के मतदान झाले आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार सतिश चव्हाण आणि भारतीय जनता पक्षाचे शिरीष बोराळकर यांच्यातच खरी लढत असून या काट्याच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Top