उस्मानाबाद, दि. 01 : उस्मानाबाद जिल्हयात आज मंगळवार दि. 01 डिसेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 26 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत.  तसेच आज दिवसभरात 51 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 15 हजार 776 इतकी झाली आहे. यातील 14 हजार 967 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 551 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 258 जणांवर उपचार सुरु आहेत.

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील कोव्हीड मृत्यूची यादी अदययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये कोव्हीड व्यतिरिक्त इतर दुर्धर आजारामुळे मृत्यू झाल्याचे भिषकांनी प्रमाणित केल्यामुळे 13 मृत्यू तसेच इतर जिल्ह्यातील रहिवाश्यांची उपचारादरम्यान जिल्हयात मृत्यू झालेले 9 असे एकूण 22 मृत्यू कमी करण्यात आलेले  आहेत.







 
Top