उस्मानाबाद, दि. 13 : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई विभागीय केंद्र उस्मानाबादच्यावतीने माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त मंगळवारी (दि.15) प्रा. ए.डी. जाधव यांचे शरद पवार- दृष्टे नेते या विषयावर व्याख्यान आयोजीत केले आहे.
छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमीक विद्यालय उस्मानाबाद येथे मंगळवारी (दि.15) सायंकाळी पाच वाजता खा. पवार यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजीत केलेल्या व्याख्यानात इतिहास व राज्यशास्त्राचे समिक्षक प्रा.ए.डी. जाधव शरद पवार दृष्टे नेते या विषयावर अभ्यासपुर्ण मांडणी करणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र उस्मानाबादचे अध्यक्ष जीवनराव गोरे भुषविणार आहेत. तर धनंजय पाटील, डॉ. जयसिंगराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या व्याख्यानासाठी शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संतोष हंबीरे व बालाजी तांबे यांच्यासह सर्व विभागीय केंद्राच्या सदस्यांनी केले आहे.