चिवरी : राजगुरु साखरे 

तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात यंदा पांढरेशुभ्र रब्बी ज्वारीचे पीक चांगलीच भरले असून, सततच्या दुष्काळी स्थिती नंतर यंदा भरलेल्या ज्वारी पिकांमुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. 

यंदा ऑक्टोबरमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिके जोमात आलेली पाहायला मिळत आहेत. यावर्षी पाण्याच्या उपलब्धतेमुळे तुळजापूर तालुक्यातील चिवरी, येवती, आरळी, चिंचोली,बीजनवाडी,चिवरी उमरगा आदी गावासह इतर गावांमध्ये शेतकऱ्यांनी रब्बी पिकासाठी ज्वारीची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे. शिवाय ऊस लागवडी  लक्षणीय वाढ झाली आहे. पीक वाढीसाठी यंदा हवामान अनुकूल असल्याने, रब्बी ज्वारीची वाढ जोमात आहे. 

तालुक्यातील परिसरात ज्वारीचे पीक जोमात असल्याचे चित्र आहे. तसेच यंदा पाऊसही मोठ्या प्रमाणात झाला असल्याने आजही जागोजागी पाणी आहे. विहिरी कूपनलिका भरून वाहत आहेत. त्यामुळे रब्बीच्या ज्वारी पिकास पाणी कमी पडणार नाही त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी दिसत आहेत.


 
Top