जळकोट  : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिजाऊ नगर भागातील रहिवासी असलेल्या एका ३३ वर्षाच्या तरुणाने  दस्तापूर (ता. लोहारा) शिवारात दि.१४ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

जळकोट येथील रहिवाशी असलेला महेश ज्ञानदेव सोमवंशी(वय-३३) याने दुपारी लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथे अवघ्या दीड महिन्यापूर्वी आपली पत्नी बाळंत झाल्याने भेटण्यासाठी सकाळी ११ वाजता गेला होता. तेथे सासरवाडीचा पाहुणचार घेऊन जेवण करून परत जळकोटला जातो. असे सांगून निघाला.  दस्तापूर शिवारातील चव्हाण यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

शेळ्या राखणाऱ्या व्यक्तिने पाहून सांगितल्याने सदर घटना उघडकीस आली. सदर क्षेत्र मुरुम पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असल्याने येणेगूर औट पोष्टच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र, आष्टा कासार येथे करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता   अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या वडील, आई,३ भाऊ, पत्नी , दोन मुली असा परिवार आहे.

 
Top