अचलेर : जय गायकवाड 

लोहारा तालुक्यातील अचलेर येथे आजपासून प्रारंभ झालेल्या भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा श्री.श्री.श्री.बसवराजेंद्र महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.

या भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक डॉ.ब्रिजपालसिंह राजपूत व एकता ग्रुप अचलेर यांच्या वतीने २१००० हजार रुपये,द्वितीय पारितोषिक राजेंद्र पाटील (लोहारा तालुका अध्यक्ष भा.ज.पा.) यांच्या वतीने ११००० रुपये,तृतीय पारितोषिक श्री.श्री.श्री.बसवराजेंद्र महास्वामीजी यांच्या वतीने ७००० हजार रुपये ठेवण्यात आले आहे.

त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने वैयक्तिक पारितोषिक ही देण्यात येणार आहे.

या स्पर्धेच्या निमित्ताने मेजर सेवक माने यांच्या कडून संयोजक संघास टी शर्ट भेट स्वरूपात देण्यात आले आहे.

या उद्घाटन सोहळ्यास लोहारा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सिद्रामप्पा दूलंगे,न्यूज सिक्सर चे संपादक सोमनाथ बनसोडे,हेड बीलिफ सुदर्शन सुरवसे,अशोक माने,अमृत माने, भारतीय जवान दिपक माने, महेश माने,नागनाथ कंटे, अमर शेख,पप्पू रूपणुर,गुरु बायस,डी. आर.माने सर यांच्यासह अनेक क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश सुरवसे यांनी केले.तर आभार सौरव मोरे यांनी मानले.

 
Top