तुळजापूर, दि. २३ : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी सवलती देण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. शेखर जगदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्राचार्य डॉक्टर शेखर जमते व प्राचार्य डॉक्टर प्रदीप घांगरेकर यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉक्टर कौस्तुभ दिवेगावकर आणि इतर सर्व विश्वस्त यांच्या अनुमतीने महाविद्यालयाने गेल्या दोन वर्षापासून गुणवंत विद्यार्थी आणि मुलींसाठी जाहीर केलेली हीच मधील सवलतीची योजना यावर्षी देखील पूर्ववत सुरू राहणार असल्याची माहिती याप्रसंगी सांगितले गेल्या दोन वर्षांमध्ये या योजनेमधून 228 विद्यार्थ्यांना लाभ मिळाला असून महाविद्यालयाने नुकतेच टेशन मिळवले आहे याशिवाय महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना गुणवंत आणि प्लेसमेंट होण्यासाठी तयार करण्याची स्वतंत्र योजना महाविद्यालयात चालविण्यात येत आहे.
अभियांत्रिकी पदवी आणि पदविका या दोन्ही कोर्सेसना सर्व अभ्यासक्रमांना ही सवलत असून अनुक्रमे 25 टक्के 50 टक्के 75 टक्के आणि 100 टक्के हीच मध्ये सवलत देण्याची श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान ची योजना कार्यरत आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. शेखर जगडे यांनी दिली.
गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना सहा हजार रुपयात अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेता येते एवढी माफक फीस आणि अत्यंत दर्जेदार अद्ययावत आणि अनुभवी प्राध्यापक आणि पायाभूत सुविधा महाविद्यालयात उपलब्ध केले आहे अलीकडच्या काळात आठ ते दहा कोटी रुपये खर्च करून महाविद्यालयाच्या कॅम्पस आणि प्रयोगशाळा यांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे अशी माहिती या निमित्ताने प्राचार्य जगदे यांनी दिली.