तुळजापूर, दि. २३ : तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकी संदर्भात दिनांक 23 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता तुळजापूर शिवसेना शहर मध्यवर्ती कार्यालय मध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजय सस्ते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना  उपजिल्हा प्रमुख शाम पवार,शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी व शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम हे होते. 

यावेळी येणाऱ्या काळात शिवसेना पक्ष खंबीरपणे ग्रामपंचायत निवडणुकीत सामोरे जाणार असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडी शक्य असेल त्या ठिकाणी महाविकास आघाडी सोबत आघाडी शक्य नाही अश्या ठिकाणी शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला. 


यावेळी शिवसेना उप-तालुकाप्रमुख सुनिल जाधव, प्रदीप मगर, संजय भोसले, रोहित नागनाथराव चव्हाण, युवा सेना माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख चेतन बंडगर, उपशहरप्रमुख बापुसाहेब नाईकवाडी, विभागप्रमुख दगडु शिंदे, महेंद्र सुरवसे, मुकुंद तोडकरी, कालिदास नाईकवाडी, अर्जुन साळुंके, विश्वनाथ दरेकर, बलभिम श्रीगिरे, बालाजी पांचाळ, अमोल गवळी, अप्पुराजे गवळी, सिद्राम कारभारी, जितेंद्र माने, आमिर शेख, सचिन मोरे, भरत मगर, भिवाजी सावंत, विकास सुरवसे, अमोल घोटकर, समाधान ढवळे, संजय चव्हाण, विठ्ठल नागमोडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top