नळदुर्ग, दि. 23 : भरधाव वेगाने येणा-या आयशर टेम्पाने दुचाकीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघाताच एकजण ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर अणदुर ता. तुळजापूर शिवारात दि. 21 डिसेंबर रोजी घडली.
याबाबात सविस्तर वृत्त असे की, साजीदआली शौकतआली शेख रा. सोलापुर हे त्यांचे मुले फैजान व तहरीन असे दि. 21/12/2020 रोजी मो. सा. क्रमांक एम एच 13 बी एम 5065 वर बसुन बसवकल्याण ते सोलापुर असे जात होते. अणदुर शिवारात आले असता आयशर टेंप्मो क्र. एम एच 13 एएक्स 3769 चा अज्ञात चालकाने आपले ताब्यातील आयशर टेंप्मो हे भरधाव वेगात वहायगईने, निष्काळजीपणे चालवुन मो. सा. क्रमांक एम एच 13 बी एम 5065 ला समोरुन जाराची धडक दिली. त्यात 1. फैजान साजिदअली शेख वय 05 वर्ष हा जागीच मयत झाला. तसेच 2. साजीदआली शौकतआली शेख वय 32 वर्ष 3. तहरीन साजिदअली शेख वय 07 वर्ष हे गंभिर जखमी झाले. अशा मजकुराच्या वाजीदअली शौकतअली शेख रा. गेंट्याल टॉकिज जवळ, सोलापुर यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन दि. 22.12.2020 रोजी भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.