जळकोट : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट , होर्टी, चिकुंद्रा, इटकळ, सराटी, केशेगाव, बाभळगाव येथे बहुजन हिताय ट्रस्ट, पुणे संचलित बहुजन हिताय विद्यार्थी वस्तीगृह, उमरगा या संस्थेच्या वतीने गरीब,होतकरू,निराधार, अंध अपंग,आत्महत्याग्रस्त शेतकरी, कुष्ठरोगी अशा कोरोनाकाळात हलाखीत जीवन जगणाऱ्या गरजू १५० लाभार्थींना, डाळ,तांदूळ,साबण, बिस्कीट, मीठ,हळद,गव्हाचं पीठ,साखर ,चहा पावडर, इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

या वस्तीगृहातील माजी विद्यार्थी शिव व्याख्याता  ऋषिकेश घोडके यांच्या पुढाकाराने त्यांच्या  मित्राच्या साह्याने वाटप करण्यात आले. ,जळकोट ,होर्टी, किलज,केशेगाव,बाभळगाव, इटकळ, सराटी ,चिकुंद्रा,वाड्यावस्त्यावर जाऊन १५०किटचे व कुष्ठरोग्यांना सेल्फ केअर औषधी किटचे व ग्रामस्थांना मास्कचे वाटप करण्यात आले  तसेच प्रत्येक गावात कोरोना जागृतीसाठी हस्तपत्रके व डिजिटल फलक लावून ग्रामस्थांना शिक्षक बागडे, हरिदास कांबळे,  परकाळे यांनी उपस्थितांना कोरोनाची काळजी कशी घ्यावी यावर मार्गदर्शन केले.

यावेळी  संस्थेचे धम्मचारी प्रजाजीत, राम कांबळे, महादेव भोसले, अक्षय गायकवाड, बागडे गुरुजी, हरिदास कांबळे, कवी सुरज अंगुले उपस्थित होते. निराधार महिला कविता भोसले, कस्तुराबाई कोळी,सारिका भोर्डे,प्रभाबाई कांबळे आदीना लाभ झाला आहे. यावेळी लाभार्थ्यांनी  संस्थेचे  आभार व्यक्त केले.

 
Top