उमरगा, दि. 23 : येथील रोटरी क्लबच्या वतीने एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्याबद्दल तसेच श्रेयस विक्रम आळंगेकर यांनी आठवी स्कॅलरशीप राज्य गुणवत्ता यादीत व उस्मानाबाद जिल्ह्यात एकमेव आल्याबद्दल  क्लबचे सचिव अनिल मदनसुरे, व्यापारी महासंघाचे सचिव हरिप्रसाद चाडक, क्लब ट्रेनर प्रा. संजय अस्वले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

सत्कार कार्यक्मात बोलताना विद्यार्थ्यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी खडतर परिश्रम व जिद्द,  चिकाटी आत्मसात करावी, असे हरीप्रसाद चाडक यांनी बोलताना केले.  पूनम साडी सेंटर-ड्रेसेसमध्ये  आयोजित या कार्यक्रमास प्रा. विनोद देवरकर, संतराम मुरजानी,  शमीम पठाण, मनिष सोनी, हिरा माखिजा आदींची उपस्थिती होती.

 
Top