तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तीनचाकी टमटम मध्ये आपली आई, पत्नी व मुलांना घेऊन गावोगावी फिरून पोट भरणारा बीड जिल्ह्यातील गणेश पडोळकर हा तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे आला असता त्याच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्याने "साहेब पोटासाठी फिरावे लागते राज्यभर तीन चाकी टमटम हेच आमचं घर आणि हे घर आणि हा प्रपंच घेऊन आम्हाला भटकंती करावे लागते" असे गणेश यांनी बोलताना सांगितले. 

इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला काम हे करावेच लागते.घरगाडा हाकण्यासाठी हातावर पोट असणार्यांना गावोगाव भटकंती करूनच आपला प्रपंच भागवावा लागतो. बीड जिल्ह्यातील गणेश पडळकर हा तीनचाकी टमटम मधुन आपल्या कुटुंबासह तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाला. शेतीसाठी लागणारे लोखंडी कुराड, विळा, खुरपे, टिकाव, फास तसेच इतर अवजारे बनवुन देऊन तो आपला प्रपंच चालवतो. गावोगाव फिरुन शेतकरी राजाची सेवा करुन मिळालेल्या पैशातून कुटुंबासाठी खर्च करावा लागतो. कधी चांगला व्यवसाय होतो तर कधी कधी काहीच विकत नाही. त्यावेळी काटकसर करून प्रपंच भागवावा लागतो. 

एका तीनचाकी टमटम मध्ये दोन जणांचा संसार घेऊन गावोगाव भटकावे लागते त्यामुळी कुठेतरी चार पैसे मिळतात अन् त्यावरच रोजच्या भाकरीचा प्रश्न सोडवावा लागतो.आजच्या महागाईच्या काळात भागत नाही पण काय करणार? पोटासाठी फिरावे लागते काम करावेच लागते.घरदार सोडून दुरवर कसे राहता? असे विचारले असता. साहेब कसलं घर अन् दार आई, पत्नी, लहान मुलंबाळं, संसारोपयोगी साहीत्य तसेच व्यवसायाचे साहीत्य घेऊन दोन कुटुंबासमवेत हे वाहन घेऊन पोटासाठी फिरावे लागतयं राज्यभर तीन चाकी टमटम हेच आमचं घर असे पिंटू साळुंके यानी बोलताना सांगितले. या समाजाला आर्थिक बळकटी येण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे असे मत पिंटू साळुंके यानी बोलताना व्यक्त केले आहे.

 
Top