उस्मानाबाद, दि. 10 : जिल्हा वार्षिक योजनेतून क्रीडांगण विकास (सर्वसाधारण व विशेष घटक योजनेकरिता)अंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे,200 मीटर अथवा 400 मीटरचा धावनमार्ग तयार करणे,क्रीडांगणास भिंतीचे/तारेचे कुंपण घालणे,विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे,

प्रसाधनगृह/चेजिंग रुम बांधणे,पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे,क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे,क्रीडांगणावर फल्ड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा/सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी/आसन व्यवस्था तयार करणे,प्रक्षेक गॅलरीवर आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे,क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे,निर्मित सुविधा विचारात घेवून मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे इत्यादी बाबीकरिता 7.00 लक्ष अनुदान मर्यादा आहे.    

उस्मानाबाद जिल्हयातील शासकीय शाळा,स्थानिक स्वराज्य संस्था(ग्रामपंचायत, नगरपरिषद,महानगरपालिका,जिल्हा परिषद,कॅन्टोनमेंट बोर्ड)शासकीय रुग्णालय,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व उच्च शिक्षण विभाग, अल्पसंख्यांक विभाग मार्फत चालविण्यात येणा-या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक/आश्रमशाळा व वसतिगृह,शासकीय ग्रामीण रुग्णालय, शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र,शासकीय जिल्हा रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच शासनाद्वारे मान्यता दिलेल्या शैक्षणिक शाळा व महाविद्यालयांना शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होवून 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत.आशा शाळा व महाविद्यालये आणि क्रीडा विभागाच्या विविध समित्या तसेच पोलीस कल्याण निधी/पोलीस विभाग,शासकीय कार्यालये हे अनुदानासाठी अर्ज करण्यात पात्र आहेत.

तरी संबंधितांनी सर्वसाधारण व विशेष घटक योजनेकरिता अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधुन विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण माहितीसह दि.17 डिसेंबर-2020पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिले यांनी केले आहे.

 
Top