तुळजापूर, दि. 18 : तालुक्यातील सिंदफळ येथील  सर्वे नंबर 257 व 258  बांधावरचा शेत रस्ता तहसीलदार सौदागर तांदळे यांनी मध्यस्ती करून कामास सुरुवात करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या वादातून प्रलंबित असणाऱ्या शेत रस्त्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून स्वतः समोर थांबून  हद्द निश्चित करून दिली. दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचे 4 फूट शेतजमीन रस्त्यासाठी घेत  शेत रस्ता तात्काळ जीसीपी ची पूजा करून कामस सुरुवात करण्यात आली. शेत रस्ता मार्गी लागण्यासाठी जिल्हा परिषद चे सदस्य धीरज पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.

यावेळी तहसीलदार तांदळे म्हणाले की, तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे हाल रस्ता नसल्याने होतात त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण होते. तालुक्यातील अनेक प्रलंबित शेत रस्त्याचे  काम आपण स्वतः लक्ष घालून लवकरच मार्गी लावणार आहे. यापुढे शेत रस्त्याला क्षेत्रास त्यासाठी कुठलेही शेतकऱ्यांची अडवणूक होता कामा नये, यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, शेत रस्त्याच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांना आपण विशेष  प्रेझेन्टेशन दिले असून लवकरच शेतकऱ्यांचे शेत रस्त्याचे  प्रश्न सुटतील, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य धिरज पाटील, पत्रकार सचिन ताकमोघे, शेतकरी आकाश गंधोरे, आबासाहेब कापसे, अनिकेत जाधव बिबीशन गंधोरे, सौदागर गंधोरे,अक्षय कापसे, पिंटू घाटशिळे,अंकुश गणेश, लांडगे, धनाजी धनके, अभिमान जाधव, रवि धनके, सोमनाथ धनके, बाळासाहेब घाटशिळे, आदीजण उपस्थित होते.

 
Top