नळदुर्ग : सुहास येडगे
नळदुर्ग शहरातील पालिकेच्या वतीने होत असलेल्या विकास कामाच्या बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे शहर भाजपाचे अध्यक्ष पदमाकर घोडके यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेवून संबंधीत ठेकेदाराला सुरु असलेल्या विकास कामात कांही दुरुस्ती करण्याचे आदेश देवून दुरुस्ती करण्याचे काम छायाचित्रासह पालिका कार्यालयाला आठ दिवसात सादर करावे असे पत्र मुख्याधिकारी यांनी दिले आहे. दरम्यान यामुळे आता शहरात विकसीत होत असलेल्या कांमांची दुरुस्ती होणार आहे. त्याच बरोबर कामाचा दर्जा ही राखला जावा असे ही मुख्याधिकारी यांनी कळविले आहे.
नळदुर्ग पालिकेच्या वतीने वैशिष्टयेपूर्ण योजने अंतर्गत हुतात्मा निलय्या स्वामी उदयान व रोकडया हनुमान मंदीर येथे गार्डन विकसीत करणे च्या माध्यमातून विकास कामे करण्यात येत आहेत, मात्र त्या ठिकाणी करण्यात आलेली कामे ही ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे निकृष्ठ दर्जाची करण्यात आली आहेत त्यामुळे नळदुर्ग शहर भाजपाचे अध्यक्ष पदमाकर घोडके यांनी या संदर्भात वेळो वेळी मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. दरम्यान जिल्हाधिकारी यांना भेटून संबंधीत कामाची तक्रारी श्री घोडके यानी दाखल करताच पालिकेचे मुख्याधिकारी यांनी या बाबत संबंधीत ठेकेदाराला या पत्र पाठवून आदेश दिले आहेत.
दरम्यान या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे निवेदन देवून श्री घोडके यांनी तक्रार दाखल केली असून या तक्रारी मध्ये त्यांनी शहरात होत असलेली विविध विकास कामे निकृष्ठ दर्जाची होत असून विविध विकास कामाची चौकशी होईपर्यंत देयकाची आदाई करण्यात येवू नये अशी मागणी घोडके यांनी केली आहे.
दरम्यान या तक्रारीची दखल घेवून वरील विषयास अनुसरुन कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन सुरु असलेली कामे गुणवत्तेचे, अंदाजपत्रकानुसार करुन घेणे बाबत आपण समक्ष सुचना देण्यात आल्या आहेत, तसेच प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आपणास सुरु असलेल्या कामामध्ये कांही दुरुस्त्या सुचविण्यात आलेल्या आहेत, आपण सुचविण्यात आल्याप्रमाणे दुरुस्तीचे कामे आठ दिवसात पूर्ण करुन घ्यावीत व त्यांच्या फोटो ग्राफीसह अहवाल पालिका कार्यालयाला सादर करावा. आपण करीत असलेली कामे गुणवत्तेची राहतील याची दक्षता घ्यावी. आपण करीत असलेले काम गुणवत्तेची नसल्याचे दिसून आल्यास आपणावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल व केलेल्या कामाचे देयक आदा केले जाणार नाही.
तसेच आपल्याला काळया यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येईल, तरी नगर परिषद कर्मचारी यांचे देखरेखीखाली सुचविण्यात आलेल्या दुरुस्तीची कामे पूर्ण करुन फोटोग्राफीसह अहवाल आठ दिवसात पालिकेला सादर करावा असे संबंधीत ठेकेदार अमीत रामलिंग राउत ता. कळंब यांना कळविले आहे. दरम्यान संबंधीत ठेकेदारांकडून दुरुस्तीचे कामे करुन घेणार की केवळ कागदी घोडे नाचविणार याकडे शहरवाशीयांचे लक्ष लागून राहीले आहे.