ताज्या घडामोडी

 


उस्मानाबाद, दि. 06 : गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यात शिवार संसद चे काम प्रगतिपथावर सुरू आहे. वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना चळवळीशी जोडून घेणे सुरू आहे.

जागतिक मृदा दिनानिमित्त मौजे वाघोली ता. उस्मानाबाद येथे सकाळी शेतकऱ्यांना एकत्र करून जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. मातीचे आरोग्य सांभाळणे किती गरजेचे आहे, मातीतील सेंद्रिय कार्बन वाढवणे तसेच माती परीक्षण करून घेणे किती गरजेचे आहे याविषयी शिवार फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक श्री अशोक कदम यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. निसर्गातील वेगवेगळे जैविक घटक वापरून इथून पुढे आम्ही जमिनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करू असे आश्‍वासन शेतकऱ्यांनी दिले. यावेळी गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांना शेतीविषयक कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा असे आवाहन शिवार फाऊंडेशन चे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.

यासाठी  मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह मुंबई, परिवर्तन ट्रस्ट,तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय गडपाटी उस्मानाबाद, बायर , जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या  शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी  अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.

 
Top