उस्मानाबाद, दि. 15 : उस्मानाबाद जिल्हयातील मत्स्यव्यवसायासाठी जे तलाव ठेक्याने गेलेले नाहीत अथवा दिलेले नाहीत अशा तलावांचा सन २०२०-२०२१ ते २०२४-२०२५ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी ठेक्याने देण्यासाठी जाहीर लिलाव (पहिली वेळ) दि. २९ डिसेंबर-२०२० रोजी सकाळी ११.३० होणार आहे.

सदर जाहीर लिलावामध्ये फक्त उस्मानाबाद जिल्हयातील कार्यरत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थानाच सहभागी होता येईल. तलावांची जाहीर लिलावाची प्रक्रिया जिल्हास्तरीय तलाव ठेका सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, उस्मानाबाद समितीच्या नियोजित सभेत घेण्यात येईल. जाहीर लिलावाच्या अटी, शर्ती, लिलावाचा दिनांक लिलावासाठी उपलब्ध तलावांची यादी इत्यादी आवश्यक तपशिल कार्यालयाच्या सुचना फलकावर चिकटविण्यात आला आहे.लिलावासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख दि.28डिसेंबर-2020 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत राहील.असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी केले आहे.

 
Top