ताज्या घडामोडी

 


जळकोट, दि. 15 : तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी सिद्रामप्पा शिवाप्पा यादगौडा( वय ८४)  यांचे वृद्धापकाळाने दि. १५ रोजी  रोजी पहाटे ३.४५ वाजण्याच्या सुमारास  रहात्या घरी निधन झाले. 

ते उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीवर असताना नळदुर्ग, उमरगा, लोहारा व जळकोट येथील बँकेत सेवा बजावली होती. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या स्वतःच्या शेतात दि१५ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुले , सूना , नातवंडे असा परिवार आहे.

 
Top