नळदुर्ग : एस.के. गायकवाड
उस्मानाबाद जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बळीराजा पार्टी समविचारी पक्ष व संघटनाशी युती करून जिल्ह्यातील सर्व ग्रा.प. निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब रोडे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
सध्या जिल्ह्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूका लागलेल्या असून या निवडणुकीत बळीराजा पार्टी सम विचारी पक्षाशी युती करून उस्मानाबाद जिल्ह्यातील होऊ घालेल्या सर्व ग्रा.प. निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्यात येणार आहे. तरी इच्छुकानी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष तात्यासाहेब रोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
बळीराजा पार्टीच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकावर युवा प्रदेश अध्यक्ष मुजीब मकानदार, जिल्हा अध्यक्ष तात्यासाहेब रोडे, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष सचिन देडे आदींच्या सह्या आहेत.