तुळजापूर, दि. 24  : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तुळजापुर तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुस-या दिवशी गुरुवार दि. 24 डिसेंबर रोजी तीन उमेदवारांनी चार अर्ज दाखल केले. दरम्यान, बुधवार दि. 23 रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

तुळजापुर तालुक्यात एकूण 53 ग्रामपंचायतीच्या निवडणुक होत असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. अर्ज स्विकारण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. दुस-या दिवशी म्हणजे गुरुवार दि. 23 रोजी चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये अणदुर व कसई येथील प्रत्येकी 1 व तामलवाडी येथील एकाच व्यक्तीने २ उमेदवारी अर्ज दाखल केले. 

 
Top