मुरूम, दि. १ : औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी मुरूम येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील मतदान केंद्रावर मंगळवार (दि. १) रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी मतदान केंद्रावर जावून मतदान केले.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी नगराध्यक्षा अनिता अंबर, उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, माजी नगराध्यक्ष सुधीर अंबर, विकासोसेचे चेअरमन दत्ता चटगे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर चव्हाण आदींनी पुढाकार घेऊन मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी पुढाकार घेतला.