नळदुर्ग, दि. 01 : वसंतनगर येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश माधवराव नकाते हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल बुधवार दि. 2 डिसेंबर रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
नळदुर्ग येथील माध्यमिक आश्रम शाळा वसंतनगर या प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश माधवराव नकाते हे 32 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. नकाते यांची सेवानिवृत्ती व सत्कार समारंभ सोहळयाचे बुधवार दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा वसंतनगर येथे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन नाईक मागास समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष वैभव जाधव, शाळेचे मुख्याध्यापक गोविंद कदम यांनी केले आहे.