नळदुर्ग : एस.के. गायकवाड

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणा नंतर तथागत भगवान गौतम बुध्दांच्या मानवतावादी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसाराची धुरा सुर्यपुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब भिमराव आंबेडकर यांनी सांभाळली असून प्रत्येकांनी बुध्दांच्या विचारांचे अंनुकरण करून समाधानाने आपले जीवन व्यतीत करावे असे प्रतिपादन ॲड. अमोल पाटील यांनी वागदरी ता.तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

वागदरी ता. तुळजापूर येथे सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या १०८ व्या जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. अमोल पाटील प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

प्रारंभी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, माजी सरपंच नागनाथ बनसोडे, ग्रा.पं. सदस्य रावसाहेब वाघमारे, ॲड. अमोल पाटील, शेतकरी अमोल गोगावे आदी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध, प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड यांनी केले. याप्रसंगी जयंती उत्सव कमीटीचे मोहन वाघमारे, अनिल वाघमारे, शिवाजी वाघमारे, महादेव वाघमारे, कल्लाप्पा वाघमारे, हणमंत वाघमारे, सहादेव वाघमारे, लक्ष्मण झेंडारे, ग्रा.प. सदस्या मुक्ताबाई वाघमारे, सुर्यकांत वाघमारे, अजय मुकदान, मुकेश धाडवे, सचिन सुरवसे, अकाश झेंडारे, आप्पा भंडारे सह महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top