काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार दि. 15 रोजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस अशोक जाधव यांच्या पुढाकाराने इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेत दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षांखालील वयोगटातील विधवांचे प्रस्ताव तयार करणे, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत निराधार वृद्ध, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजारांने रोगग्रस्त, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिलांना अर्थ सहाय्य मिळवून देण्याच्या उद्देशाने संजय गांधी निराधार योजनेसाठी प्रस्ताव तयार करणे, तसेच श्रावण बाळ योजने अंतर्गत 65 व 65 वर्षांवरील निराधार वृद्ध व्यक्तींना मासिक निवृत्ती वेतन मिळवून देण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याच्या कामास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोक जाधव यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.
जाधव हे स्वत: वैयक्तिक फॉर्म भरून घेत असून 80 लोकांचे प्रस्ताव तयार करून निस्वार्थपणे, स्वखर्चातून 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण या भावनेतून त्याचा पाठपुरावा करून गरजूंना निराधार पेंशन योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अशोक जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले.या वेळी निराधार लोकांच्या उपस्थितीत मा.खा. शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस अशोक जाधव, धनाजी गायकवाड, बबन हेडे,नजीब काझी, विश्र्वास बोराडे आदीसह ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.