तुळजापूर, दि. 06 : तुळजापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यावतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
तुळजापूर येथील आर्या चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम नगरसेविका सौ वैशाली कदम, विधानसभा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, शहराध्यक्ष अरुण कदम, विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम, श्रमिक ब्रिगेड अध्यक्ष अप्पासाहेब कदम, वैजनाथ पांडागळे आप्पा कदम, तानाजी उमाजी कदम, बाबासाहेब कदम, नंदकुमार कदम, अविनाश कदम, किशोर गंगावणे, पप्पू सिद्ध गणेश, महादेव सोनवणे, तानाजी डावरे, किरण शेरखाने, नितीन शिंदे दत्ता लोंढे, बंडू चौधरी, शंकर देवकर यांची वेळी उपस्थिती होती.